Pune : महापालिकेपुढे कंत्राटी कामगारांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

Pune : महापालिकेपुढे कंत्राटी कामगारांचे आंदोलन

पुणे : पुणे महापालिका कामगार युनियनतर्फे कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी "आक्रोश झाडू मोर्चा " काढण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार सहभागी झाले होते.

महापालिकेच्या सर्व खात्यामध्ये सात हजार कंत्राटी कामगार आहेत. गेली १५ वर्षापासून तुटपुंज्या वेतनावर स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून कामे करत आहेत. दोन वर्षापासून बोनस, घरभाडे भत्ता, रजा वेतन बंद केले आहे. ते पुन्हा सुरू करावेत व ही रक्कम दिवाळीपूर्वी द्यावी अशी मागणी करण्यात आली. पीएफ, ईएसआय व प्रत्येक महिन्याचे वेतन १० तारखेच्या आत द्यावे ही मागणीही करण्यात आली.

या सर्व कंत्राटी कामगारांच्या मागण्या प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात अन्यथा आम्हाला रस्त्यावरची व कायदेशीर लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा अध्यक्ष उदय भट दिली. यासंदर्भात युनियनने अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या बरोबर चर्चा केली. चंद्रकांत गमरे, संयुक्त चिटणीस मधुकर नरसिंगे, कार्यालयीन चिटणीस वैजीनाथ गायकवाड, उपाध्यक्ष दिलीप कांबळे, ओंकार काळे, शोभा बनसोडे, राम अडागळे, धनंजय आयवळे, रोहिणी जाधव, जयश्री भिसे, करुणा गजधनी, अरुण शेलार, रमेश पारसे, प्रकाश चव्हाण, राजेश पिल्ले, तानाजी रिकीबे, प्रकाश हुरकडकली आदी उपस्थित होते.