पुणेकरांच्या २२ प्रश्नांची उत्तरं; काय सुरू काय बंद?

पुणे महापालिककडून नवीन लॉकडाऊनचे नियम जाहीर
Pune Lockdown
Pune Lockdownsakal Media

पुणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुणे महापालिकेकडून बुधवार रात्री आठपासून शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. या आदेशानुसार शहरात एक मे सकाळी सातपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार कोणत्या गोष्टींना या काळात सूट राहणार आहे. तसेच कोणत्या प्रकाराची बंधन असणार आहेत.

त्याबाबतची माहिती प्रश्‍नउत्तरांच्या स्वरूपात पुढीलप्रमाणे :

प्रश्‍न : ब्रेक दि चेन कधीपासून लागू होणार

उत्तर : बुधवारी सायंकाळी सहापासून १ मे सकाळी सातपर्यंत राहणार

प्रश्‍न : शनिवार व रविवारी लॉकडाउन राहणार का

उत्तर : होय, अत्यावश्‍यक सेवा व औषधांची दुकाने वगळून

प्रश्‍न : सोमवार ते शुक्रवार या काळात काय काय सुरू राहणार

उत्तर : किराणा, भाजीपालासह अत्यावश्‍यक सेवेशी संबंधित सर्व व्यवसाय व दुकाने

प्रश्‍न : त्यांची वेळ काय असणार

उत्तर : सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत

प्रश्‍न : वाहतूक सुरू राहणार का.

उत्तर : या कालावधी एसटी, बस, रेल्वे, विमानसेवा, रिक्षा सुरू राहणार

Pune Lockdown
‘पंच’नामा : माझं कुटुंब, ‘किंबुहना’ माझी जबाबदारी

प्रश्‍न : सर्वसामान्य नागरिकांना त्यातून प्रवास करता येणार का

उत्तर : अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार

प्रश्‍न : पीएमपीची सेवा सुरू राहणार का

उत्तर : फक्त अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी

प्रश्‍न : रिक्षा सुरू राहणार का

उत्तर : होय, वाहन चालक आणि दोन व्यक्तींना परवानगी

प्रश्‍न : खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू राहणार का

उत्तर : होय. सकाळी सात ते सायंकाळी ६ पर्यंत

प्रश्‍न : खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर जाऊन पार्सल घेता येणार का

उत्तर: होय. फक्त पार्सल घेता येणार आणि त्यासाठी बाहेर पडता येणार

प्रश्‍न : खासगी वाहतुकीला परवानगी राहणार का

उत्तर - होय. परंतु अत्यावश्‍यक सेवेसाठी

प्रश्‍न : नागरीकांना लसीकरणासाठी जाता येणार का

उत्तर : होय

Pune Lockdown
रेमडेसिव्हिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

प्रश्‍न : बाहेर गावावरून येणाऱ्या नागरीकांना घरी जाण्यासाठी काय सोय असणार

उत्तर : रिक्षा, टॅक्सी, कॅब. तसेच प्रवास करून आलेल्या तिकीट असणाऱ्यांना पीएमपीतून प्रवास करता येणार

प्रश्‍न : हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू राहणार का

उत्तर : सुरू राहणार नाही, परंतु पार्सल मागविता येणार (रात्री अकरापर्यंत)

प्रश्‍न : खानावळीत जाऊन जेवण करता येणार का-

उत्तर : नाही. फक्त पार्सल घेऊन जाता येणार

प्रश्‍न : मटण, मासे, चिकन, अंडी विक्रीची दुकाने सुरू राहणार का

उत्तर : होय. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवशी (स. ७ ते सायं. ६पर्यंत)

प्रश्‍न : आंतरजिल्हा वाहतूक करता येणार का

उत्तर : होय , फक्त अत्यावश्‍यक सेवा व कारणांसाठी करता येणार

प्रश्‍न : बांधकामे सुरू राहणार का

उत्तर : कामगाराच्या निवासाची सोय असेल, असे प्रकल्प सुरू राहणार

प्रश्‍न : मॉर्निंग वॉकसाठी परवानगी असणार का

उत्तर : नाही.

Pune Lockdown
शरद पवार यांना दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज

प्रश्‍न : सोसायटीच्या आवारात मॉर्निंग वॉक, व्यायामास परवानगी असणार का

उत्तर : नाही.

प्रश्‍न : घरेलू कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, घरी आजारी असलेल्या नागरीकांना सेवा देणाऱ्यांना परवानगी आहे काय?

उत्तर : होय, आठवड्यातील सर्व दिवस सकाळी सात ते रात्री दहा यावेळेत परवानगी राहणार

प्रश्‍न : पीठ गिरणी सुरू राहणार का

उत्तर : होय

प्रश्‍न : शिफ्टमधील कंपनी, उद्योगातील कर्मचाऱ्यांना कामावर जाता येणार का

उत्तर : होय, खासगी बस किंवा खासगी वाहनातून जाता येणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com