

Pune Anti-Encroachment Drive
esakal
पुणे : रस्ते, पदपथ, फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनवर अतिक्रमणे करून थाटलेले व्यवसाय, त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेविरोधात पुणे महापालिकेने गेल्या १३ दिवसांपासून जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या काळात १८ लाख ८४ हजार ६४१ चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले. मात्र, कारवाईनंतर काही तासांतच अनेक ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे झाली असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे महापालिकेच्या मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.