PMC Budget 2023 : पुण्यात होणार ८ नवे उड्डाणपुल! महापालिकेच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा

पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत चालला आहे.
pune
punesakal

PMC Budget 2023 : पुणे महानगर पालिकेचा प्रशासकीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. आज (दि. २४) ९५१५ कोटी रुपयांचे २०२३-२४ वार्षिक बजेटपुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (प्रशासक) यांनी केले घोषित केला. यामध्ये पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेट मध्ये ९२३ कोटींची भर घालण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद ही पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी १३२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शहरातील मलिनिसरणासाठी ८१२ कोटी रुपये तर घनकचरा व्यवस्थापनसाठी ८४६ कोटी जाहीर करण्यात आले आहेत.

वाहतूक नियोजन व प्रकल्प साठी ५९० कोटी रुपये, तर पुण्यातील रस्त्यासाठी ९९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पीएमपीएल साठी ४५९ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली.

पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी ४६८ कोटी रुपये तर आरोग्यासाठी ५०५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

pune
Virar Train Accident : विरार स्थानकात रेल्वेने कुटुंबाला उडवलं; पती पत्नीसह तीन महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू

नियमित मिळकत कर भरणाऱ्याना पुणे महानगर पालिका बक्षीस जाहीर करणार असल्याचे देखील आयुक्तांनी यावेळी सांगितलं. यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांवर मिळकतकर आणि पाणीपट्टी दरांमध्ये कुठलीच वाढ करण्यात आलेली नाहीये.

वाहतूक कोंडी सुटणार

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात ८ नवीन उड्डाणपूल उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी विशेष तरतूद देखील केली आहे. तसेच पगार आणि पेन्शन वर सुमारे ३१०० कोटी खर्च होणार आहेत.

pune
Pune Crime News : आता तुमचा मर्डरच करतो म्हणत तरुणावर कोयत्याने वार; मनगटापासून पंजाच तुटला

पुण्यात होणारे काही महत्त्वाचे प्रकल्प :

  • पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारणार

  • वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल

  • सिंहगड रोड उड्डाणपूल, नदी पुनर्जीवन प्रकल्प होणार

  • डॉग पार्क, हायड्रो ऊर्जा प्रकल्प, चार्जिंग स्टेशन उभारणे आदींचा समावेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com