
Pune Crime News : आता तुमचा मर्डरच करतो म्हणत तरुणावर कोयत्याने वार; मनगटापासून पंजाच तुटला
पुण्यात कोयत्याने वार करत एका तरुणाचा मनगटापासून पंजा तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कात्रज भागात भर दिवसा घडल्याने खळबळ उडाली आहे.
अखिलेश चंद्रकांत कलशेट्टी असे या तरुणाचे नाव असून सुदैवाने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला आहे. अभिजीत दुधनीकर यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी ५-६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी फिर्यादी यांनी आरोपींच्या विरोधात तक्रार दिली होती. फिर्यादी व अखिलेश हे दुचाकीवरुन जात असताना आरोपींनी त्यांची वाट अडवली आणि "तुम्ही आमच्यावर केस करता का? थांबा आता तुमचा मर्डरच करतो", असे म्हणताच त्यांनी फिर्यादी यांच्यावर वार केले.
हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
सोबत असलेल्या अखिलेश वर वार करताना त्याने त्याचा डावा हाथ पुढे केला असता आरोपींनी हातावर केल्याने त्यात त्याचा मनगटापासून पंजा तुटला. जखमी असलेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.