

PMC Carbon Credit Plan
esakal
पुणे: पर्यावरणपूरक प्रकल्प केवळ प्रदूषण कमी करण्यापुरते मर्यादित न राहता आता महापालिकेसाठी उत्पन्नाचे साधन ठरणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, बायोगॅस, सौर ऊर्जा, ई-बस आणि एलईडी पथदिवे यांसारख्या प्रकल्पांमधून कार्बन क्रेडिट मिळवून त्याची विक्री करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेत पुढे आला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच महापालिकेला अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.