
पुणे : रस्ते, मलवाहिन्या, पावसाळी गटारे, महापालिकेच्या इमारती यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे मुख्य खात्याने न करता ती क्षेत्रीय कार्यालयांमार्फत केली जावीत. मुख्यखाते आणि क्षेत्रीय कार्यालय यांच्यातील कामाच्या टोलवा टुलवीमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने देखभाल दुरुस्तीच्या कामांची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात येणार आहे. तर मुख्य खात्याने नवीन भांडवली कामे करावीत अशी चर्चा आज (ता. ३०) पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. पुढील आठवड्याभरात यावर आणखी चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे.