

Pune Municipal Corporation considers cloud seeding as a potential solution to mitigate water scarcity in dams
sakal
पुणे : जून महिना संपला तरी अजून दमदार पावसाला सुरुवात झालेली नाही. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. पुढील काळात पाण्याचे संकट आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी पक्षनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली असून, प्रशासनाला याची चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत. आता हा प्रस्ताव व्यवहार्य ठरणार का? याकडे लक्ष लागले आहे.