.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Water supply
पुणे - भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या प्रतिकूल अंदाजामुळे पुणे महापालिकेने शहरात पाणी कपात सुरु केली आहे. पण त्यानंतरही व्यावसायिकांकडून पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कडक पावले उचलत पिण्याचे पाणी वाया घालवणे किंवा त्याचा गैरवापर करणाऱ्यांवर १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. वारंवार हीच चूक केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. असा इशारा महापालिकेने दिला आहे.