पुणे महापालिकेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूष करण्यासाठी काय घेतला निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

या सभेतील भन्नाट निर्णय 

  • शहरभर बेकायदा बांधकामे थाटणे
  • नगरसेवकांची मालमत्ता करमुक्त कराव्यात
  • ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना वर्षभर पगारी सुटी
  • शहरातील बेरोजगारांच्या बॅंक खात्यात महिन्याकाठी ५० हजार रुपये जमा करावेत

पुणे - पुण्यातील कॉलेजचे तास बागांमध्ये भरतील आणि हिरव्यागार झाडांच्या फांद्याखाली सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय असेल !  तेव्हा, काय गंमत येईल ना? खास ‘व्हॅलेंटाइन डे’चा मुहूर्त साधून पुणे महापालिकेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूष करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. म्हणजे, काय गंमतच ना? पण या भन्नाट निर्णयाची अंमलबजावणी मात्र तशी होणार नाही.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त खास ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी महापालिकेची ‘उल्टा-पुल्टा’ सभा झाली. त्या वेळी असे अनेक गमतीदार निर्णय घेण्यात आले. पदाधिकारी-नगरसेवक हे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या तर अधिकारी हे पदाधिकारी-नगरसेवकांच्या भूमिकेत होते. एरवीसारखे सभेचे कामकाज सुरू झाले, अधिकारी वेळेत आले नसल्याचा आक्षेप घेत, पदाधिकारी-नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला.

पुण्यातील 'या' दोन मेट्रो मार्गांचे काम मार्चअखेरपर्यंत होणार

त्यावर नेहमीप्रमाणे प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि सभा रंगली. आपापल्या ‘इंटररेस्ट’च्या विषयांवरून चिमटेही काढले. अशा प्रकारे मुरलेल्या राजकारण्यांना त्यांच्याच शैलीत राजकारण आणि सभागृहाचे कामकाज शिकविण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आघाडी घेतली. अधिकाऱ्यांच्या भूमिकेतील नेत्यांनीही प्रशासनाच्या कारभाराची झलक मांडण्याची संधी साधली. सभागृहातील दीड तासाच्या कामकाजात नव्या भूमिकेत असलेले महापौर शेखर गायकवाड, स्थायी समितीच्या अध्यक्षा रुबल अगरवाल, सभागृहनेते सुनील पारखी, तसेच राजेंद्र मुठे, अनिरुद्ध पावस्कर, माधव जगताप यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. तर आयुक्तांच्या खुर्चीत मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त धीरज घाटे, तसेच दीपाली धुमाळ, नगरसचिव सुशील मेंगडे, भय्यासाहेब जाधव, नंदा लोणकर यांनी प्रशासकीय कामाचे वेळापत्रक मांडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune municipal corporation decided to make college students happy