दुकाने उघडण्यास पुणे महापालिकेची परवानगी पण...; वाचा काय आहेत बदल

Pune-Shopkeeper
Pune-Shopkeeper

पुणे : गेल्या दहा दिवसांपासून शहरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन उठणार असला, तरी उद्यापासून (शुक्रवार) दिवसाआड (पी 1 - पी 2) सर्व प्रकारची दुकाने (वाइन शॉपसह) उघडण्यास परवानगी राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्य सरकारने 1 जुलै रोजी ठरवून दिलेल्या निर्देशानुसार पुणे शहरात अनलॉक-2 पद्धतीनेच त्यांची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर नव्याने कंटेन्मेंन्ट झोनची फेररचना करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात 13 जुलै ते 23 जुलैपर्यंत विशेष लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आज रात्री त्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली. दरम्यान आज सकाळी पुणे शहरातील ऐंशी व्यापारी संघटनांची शिखर संस्था असलेल्या पुणे व्यापारी महासंघाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांची भेट घेऊन लॉकडाऊन आणि दिवसाआड दुकाने सुरू करण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे प्रशासन काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

आज महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विशेष कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील घोषणा केली.
राव म्हणाले," लॉकडाऊन उठल्यानंतर यापूर्वी एक जुलैपासून जे नियम लागू होते. तेच नियम 31 जुलैपर्यंत राहणार आहे. तर पी 1 पी 2 या पद्धतीने म्हणजे दिवसाआड दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे.''

व्यापाऱ्यांनी समजून घ्यावे
पी 1 - पी 2 या पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यास ते आम्ही पाळणार नाही, असे पुणे व्यापारी महासंघाने स्पष्ट केले होते. त्यावर विचारले असताना राव म्हणाले, "व्यापाऱ्यांकडून दोन पर्याय आले आहेत. त्यावर प्रशासन चर्चा करून निर्णय घेईल. परंतु सध्या राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारी नियम पाळून सहकार्य करतील.''

उद्यापासून हे सुरू राहणार
- अत्यावश्‍यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार
- खाद्यपदार्थांची घरपोच सेवा
- सायकलिंग, धावणे, चालणे, अन्य व्यायाम
- वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण
- सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती असावी
- केश कर्तनालय, स्पा, पार्लर यांना नियम पाळून मुभा
- टॅक्‍सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आवश्‍यक प्रवासासाठी मुभा
- वाइन शॉपसह सर्व प्रकारची दुकाने पी 1- पी 2 या पद्धतीने उघडण्यास परवानगी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com