'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने आणखी एक पाऊल; 'डीआरडीओ'च्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा फायदा होणार खाजगी उद्योगांना

DRDO
DRDO

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वतीने देशातील विविध खाजगी उद्योगांबरोबर तब्बल एक हजार 'लायसनसिंग करार' करण्यात आले आहे. यामध्ये 'आत्मनिर्भर भारत' संकल्पने अंतर्गत 'डीआरडीओ'तर्फे विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून संरक्षण उत्पादनास चालना देण्यासाठी खाजगी उद्योगांना संधी मिळणार आहे.

कोरोनाच्या कठीण काळात संपूर्ण देश एकत्रित आला असून देशाने स्वदेशी तंत्रज्ञानांवर भर देण्यास सुरुवात केली. यामध्ये लष्कराच्या आयुध निर्माण कारखान्यांबरोबरच डीआरडीओने कोरोना विरोधातील लढाईसाठी खाजगी उद्योगांच्या मदतीने विविध तंत्रज्ञान आणि संसाधने विकसित केली. या कठीण काळात 'स्वदेशी' या संकल्पनेचे महत्व आणखीन वाढले असून देशाच्या आर्थिक प्रश्नाला सोडविण्यासाठी खाजगी उद्योगांना 'बूस्ट' करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्यासाठी 'डीआरडीओ' मार्फ़त विकसित करण्यात आलेल्या सुमारे ५५० हून अधिक स्वदेशी तंत्रज्ञान खाजगी उद्योगांना देऊन संरक्षण उत्पादनात वाढ केली जाणार आहे. यामुळे केवळ संरक्षण क्षेत्रच नाही, तर देशाचे उद्योग क्षेत्रसुद्धा आत्मनिर्भर म्हणून ओळखले जाईल. अशी माहिती डीआरडीओच्या 'डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्री इंटरफेस अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट' (डीआयआयटीएम) तर्फे देण्यात आली. 

सध्या डीआरडीओ सुमारे १४ हजार व्यवसाय संस्थांशी जुडलेले आहे. त्यातील सुमारे एक हजार ८०० हून अधिक मोठे, मध्यम व लघु उद्योग हे प्रत्येक्ष व अप्रत्येक्ष स्वरूपात डीआरडीओ सोबत उत्पादन कार्यात सक्रिय आहेत. तर यातून सुमारे ४०० उद्योग हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये एल अँड टी, गोदरेज, भारत फोर्ज पुणे, वालचंदनगर इंडस्ट्री, आयडीआ फोर्ज, इकॉनॉमिक एक्सप्लोझिव लिमिटेड (इइएल), पुण्यातील वर्ल्ड वाईड ऑइल फिल्ड मशिन (डब्ल्यूओएम), निख्तीश एंटरप्रायझेससारख्या विविध उद्योगांचा समावेश आहे.

"आत्मनिर्भरतेच्या वाटचालीवर संरक्षण क्षेत्रात उत्पादनासाठी खाजगी उद्योगांना सामील करण्याचा हा निर्णय महत्वाचा आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात देशाचे जीडीपी वाढू शकेल. त्याचबरोबर रोजगाराची संधीसुद्धा वाढेल. तसेच यामध्ये विविध क्षेपणास्त्र, सेन्सर्स, रडार यंत्रणा, सोनार यंत्रणा, शस्त्रास्त्र, लढाऊ अभियांत्रिकी, विमानासाठीची यंत्रणा अश्या विविध संरक्षण उत्पादनांवर भर दिला जाणार आहे."
- मयंक द्विवेदी, संचालक - डीआयआयटीएम

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खासगी उद्योगांचा 'बूस्टर इम्पॅक्ट'
- मोठ्यांपासून लघु उद्योजकांना मिळेल संधी
- शास्त्र तसेच इतर यंत्रणांसाठी विदेशी तंत्रज्ञानाचा वापर कमी
- रोजगाराची संधी वाढेल
- स्टार्टअप कंपनींना देखील फायदा
- देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास चालना मिळेल
- आयात कमी करून निर्यातीच्या क्षेत्रात सक्षम पाऊल
- कमी वेळेत जास्त उत्पादन क्षमता
- कमी खर्चात चांगले उत्पादन
- सुमारे 200 कोटी रुपयांपर्यंत भारतात कोणत्याही प्रकारचे आयात होणार नाही.
- स्वदेशी संरक्षण उत्पादनाची निर्मिती मोठ्या प्रमाणात
- खासगी उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन धोरणांची मांडणी

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com