

Pune BJP Core Committee to Discuss Municipal Poll Strategy
sakal
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्याची रणनीती ठरविण्यासाठी आणि भाजपतर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक उद्या (ता. ७) सकाळी होणार आहे. या बैठकीत बाहेरच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेची निवडणूक पुढील काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारीसाठी कंबर कसली आहे. भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी यापूर्वीच सुरु केली आहे. पण प्रत्यक्ष उमेदवारी निश्चित करण्याच्या दृष्टीने प्रथमच कोअर कमिटीमध्ये चर्चा होणार आहे. त्यासाठीही ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.