

PMC's GIS Survey for Groundwater
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून आगामी निवडणुकीची राजकीय समीकरणे काय असतील याची चर्चा आता सुरू झालेली आहे. भाजपने महापालिका पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलेली असताना महाविकास आघाडीने मात्र अजित पवार यांना सोबत घेतल्यास भाजपला रोखता येईल अशी भूमिका घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही समविचारी पक्षांसोबत जाण्यास तयार आहोत असे सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि मनसे यांची मोट बांधली पाहायला मिळू शकणार आहे.