

Pune Municipal Corporation Election
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक ९०० मतदारांमागे एक मतदान केंद्र असणार आहेत. यानुसार संपूर्ण शहरात ३ हजार ९४६ मतदान केंद्रांची निर्मिती केली जात आहे. शाळा, शासकीय, निमशासकीय इमारती, सोसायट्यांमधील जागांचा शोध सुरु आहे. गरज पडल्यास पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.