

Pune Corporation Election
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये शहरातील काही अनुभवी माजी नगरसेवकांनी मतदारांची पळवापळवी सुरू केली आहे. विरोधात जाणारे मतदान अन्य प्रभागांत आणि दुसऱ्या प्रभागांतील मतदान जे आपल्या बाजूने पडण्याची शक्यता आहे त्यांना स्वतःच्या प्रभागांत वळविण्यासाठी खटाटोप सुरू आहे. त्यासाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरले जात आहे. प्रकार मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्येही सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे.