

पुणे : पुणे महापालिकेत शेकडो कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असताना काही कर्मचारी पदोन्नती घेतल्यानंतर काही महिन्यांतच ती नाकारून पुन्हा पूर्वीच्या पदावर जाण्याची मागणी करत आहेत. पदोन्नती मागे घेण्यासाठी (पदावनती) लाखो रुपयांची डील होत असल्याचा दावा महापालिकेतील कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.