
Pune Latest News: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. प्रारूप प्रभाग रचनेत काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. तर काही ठिकाणी राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ही प्रभाग रचना अंतिम झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या नजरा आता आरक्षणाच्या सोडतीकडे लागलेल्या आहेत.