

Pune Municipal Corporation waste collection drive
sakal
पुणे : पुणे महापालिकेने विमाननगरमध्ये कचरा संकलनासाठी ‘स्वच्छ पुणे विश्वास’ हा उपक्रम सुरु केला आहे. पण येथील व्यावसायिकांकडून कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर करणे, अस्वच्छता निर्माण करणे यामुळे नागरिकांवर कारवाई करून आत्तापर्यंत सुमारे ८५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहराच्या अन्य भागातही अशी कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.