पुणे महानगरपालिकेच्या 'या' उद्यानात पक्षी आणि किटकांसाठी मेजवानी (Video)

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

फुलांमधील रस पिण्यासाठी विविध प्रकारच्या मधमाशा, कीटक, भुंगे फुलांभोवती पिंगा घालताना दिसतात तर, विणीचा हंगाम असल्याने विविध पक्षी येथे उपलब्ध असलेले सुर्यफुलांचे बी खाण्यासाठी गर्दी करीत आहेत.

वडगाव शेरी: विमाननगर येथील पुणे महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये परिसरातील कीटक व पक्षी यांच्यासाठी सध्या खास मेजवानी सुरू आहे. लुंकड फाउंडेशनच्या पुढाकाराने उभारलेल्या नक्षत्र उद्यानात या मेजवाणीचा अनुभव सध्या येतो आहे.

उद्यानातील साधारणतः दहा गुंठे जागेत नक्षत्र उद्यान आहे. त्यातील वाफ्यांमध्ये सुर्यफुलांची लागवड करण्यात आली होती. ती सुर्यफूले सध्या चांगलीच बहरली असून काहींमध्ये बिया भरल्या आहेत. फुलांमधील रस पिण्यासाठी विविध प्रकारच्या मधमाशा, कीटक, भुंगे फुलांभोवती पिंगा घालताना दिसतात तर, विणीचा हंगाम असल्याने विविध पक्षी येथे उपलब्ध असलेले सुर्यफुलांचे बी खाण्यासाठी गर्दी करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही सुर्यफूले खास कीटक व पक्षांकरिता लावल्याची माहिती लुंकड रियालिटी व लुंकड फाउंडेशनचे उद्यान व्यवस्थापक दत्ता निकाळजे यांनी दिली. निकाळजे म्हणाले, या ठिकाणी देशी गाईंचे शेणखत वापरून मशागत केल्याने सुर्यफुलांचे पीक छान आले. आम्ही दरवर्षी हा उपक्रम विविध ठिकाणी घेतो. नगर रस्त्यावरील दुभाजकांमध्येही सुर्यफूले लावली आहेत. यामुळे पाखरांना खाद्य उपलब्ध होते. आजूबाजूला पाखरांची घराटीही वाढल्याचे दिसते. हा उपक्रम उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, राहुल दागलिया, गुरस्वामी तुम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Municipal Corporation garden wadgaonsheri

Tags
टॉपिकस
Topic Tags: