फुटकळ कामांवर महापालिकेची खैरात ; आर्थिक अडचणींचा विसर पडल्याने दहा कोटींच्या निविदा

Pune Municipal Corporation has undertaken the work of repairing toilets, drainage lines, construction of leaf sheds.
Pune Municipal Corporation has undertaken the work of repairing toilets, drainage lines, construction of leaf sheds.

पुणे : तिजोरीत शे-सव्वाशे कोटी रुपये उरल्याने रोजचा खर्च कसा भागवायचा ? अशा कात्रीत सापडलेल्या महापालिकेनेच स्वच्छतागृहे, ड्रेनेजलाइनच्या दुरुस्त्यांसह ब्लॉक, राडारोडा, रंगरंगोटी, पत्र्याचे शेड उभारण्याची कामे काढली आहेत. या डागडुजीच्या कामांवर तेही ठराविक प्रभागांत एक-दोन नव्हे तर 10 कोटींचा खर्च करायचा आहे. तशा निविदाही महापालिकेने काढल्या आहेत. 

एकीकडे आर्थिक संकट असल्याने फुटकळ कामे न करण्याची भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली असतानाच, नगर रस्ता आणि ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयांनीही कामे काढली आहेत. चौकाचौकात दिशादर्शक फलक उभारणे, कुस्ती आणि अन्य प्रशिक्षण केंद्रांची दुरुस्ती, रस्त्यावर पडलेला राडारोडा उचलणे, सिमेंट आणि डांबरी रस्त्याची डागडुजी करण्याची जवळपास 80 कामे करण्याचा क्षेत्रीय कार्यालयांचा प्रयत्न आहे.

कोरोनाच्या काळात उत्पन्नात मोठी घट होऊन, आजघडीला सुमारे १०० कोटी रुपयेही महापालिकेच्या हाताशी नाहीत. या पुढच्या तीन-चार महिन्यांत उत्पन्नाचा आकडा वाढण्याची फारशी शक्‍यता नाही. त्यामुळे प्रभागांच्या पातळीवर मर्यादा आणत, त्या कामांच्या निधीलाही कात्री लावली आहे. पुरेशी तरतूद नसलेली कामे हाती घेता येणार नाहीत, असा आदेशच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढला आहे. त्यानंतरही नगरसेवकांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून, गल्लीबोळातील कामांचा आग्रह धरला. त्यानंतर भल्यामोठ्या यादीसह निविदाही काढण्यात आल्या.

खातेप्रमुखांकडून आदेश धाब्यावर

शहरातील विशेषतः गल्लीबोळातील कामे बाजूला सारून, महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्यापासून आयुक्त विक्रम कुमार यांनीही स्पष्ट केले. परंतु, ही बाब खातेप्रमुख आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी फारशी मनावर घेतली नसल्याचे दिसून कामाच्या यादीवरून लक्षात येत आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता, कामांचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. त्यानुसार निविदा काढण्याची सूचना खातेप्रमुख आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केली आहे. मात्र, ज्या कामांची खरोखरीच गरज नाही, ती तूर्तास तरी केली जाणार नाहीत.
- हेमंत रासने, अध्यक्ष स्थायी समिती, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com