Pune Municipal Corporation: महापौर या शब्दाचा इतिहास माहिती आहे का? थेट सावरकरांशी आहे संबंध!

सावरकरांकडून अभिनंदनाचे पत्र त्यांच्याकडे आले. त्यात म्हटले होते,“पत्र पाठवण्यास विलंब होत आहे, क्षमस्व. ’मेयर’ या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. तो शब्द
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationesakal

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेची स्थापना 15 फेब्रुवारी 1950 साली झाली होती, या घटनेला आता तब्बल 73 वर्ष होता आहेत. याच महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात अन् हा नेता शहराचा महापौर असतो.

Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation : आता सवयच झालीये एकटेपणाची...

पण तुम्हाला माहिती आहे का की हा महापौर शब्द पूर्वीपासून वापरात नाही.. खरंतर इंग्रज येण्यापूर्वी हा शब्द आपल्या मराठी शब्दकोशातही नव्हता. तेव्हा इंग्रजांनी मेयर हा शब्द प्रचलित केला होता. आजही भारतात महाराष्ट्र सोडला तर सगळीकडे मेयर म्हणण्याचीच पद्धत आहे.

Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation : पालिकेच्या प्रयोगशाळा रुग्णांसाठी वरदान! कमी पैशांत आरोग्य सुविधा

कसा आला “महापौर” हा शब्द 

दिनांक, दूरध्वनी, चित्रपट, महापौर, संकलन असे तब्बल 40-45 शब्द स्वा. सावरकरांनी त्यांच्या कारकीर्दीत मराठी माणसांना दिले. मराठी भाषेत अनेक परकीय भाषांतील शब्दांची सरमिसळ झाली होती. स्वा. सावरकरांनी भाषाशुद्धीचे कार्य हाती घेतले. त्यांनी परकीय शब्दांना पर्यायी सहज लक्षात राहतील असे मराठी शब्द दिले.

Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation : मांजर पाळण्यासाठी लागणार लायसन्स नाहीतर...

अशी आली कल्पना 

1938 मध्ये साहित्य संमेलन भरले होते, तेव्हा त्याच्या अध्यक्षपदी स्वा. सावरकरांना निवडले गेले होते. याच ठिकाणी बोलताना स्वा. सावरकरांनी भाषाशुद्धीबद्दल आग्रही मत मांडले. मराठी भाषेत परकीय शब्द मिसळले गेले आहेत आणि सामान्य माणसाच्या रोज वापरात येऊ लागले आहेत, हे चुकीचे म्हणून त्यांनी हट्ट केला. 

Pune Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation : ‘अमृत’ मध्ये समाविष्टासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

अन् मेयरचा महापौर झाला 

सावरकरांना मानणारे गणपतराव नलावडे पुणे शहराचे ’मेयर’ झाले ही वार्ता कळल्यावर दोन दिवसांनी सावरकरांकडून अभिनंदनाचे पत्र त्यांच्याकडे आले. त्यात म्हटले होते, – “पत्र पाठवण्यास विलंब होत आहे, क्षमस्व.’मेयर’ या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. तो शब्द मिळाला, ’महापौर’. ’महापौर’ हा शब्द अधिक योग्य वाटतो.

Pune Municipal Corporation
Andaman Cellular Jail : सावरकरांच्या कारावासामुळे फेमस झालेलं सेल्युलर जेल नक्की कोणी बांधल? जाणून घ्या इतिहास

पत्र मिळताच पुण्याचे मेयर गणपतराव नलावडे आपल्या कार्यालयाबाहेर धावले. त्यांनी शिपायाला ’मेयर ऑफ पुणे’ ची पाटी काढायला लावून तिथे ’महापौर’ची पाटी लावण्याचे आदेश दिले. तेव्हापासून हा शब्द रुळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com