

Unauthorized Hoardings in Pune Face Higher Penalties as Municipal Corporation Revises Fine to Two Lakh Rupees
sakal
पुणे : शहरातील अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्सवर महापालिका दंडात्मक कारवाई करते; पण हा दंड कमी असल्याने शुल्क बुडवून चमकोगिरी करणारे राजकीय नेते, संस्था, फलक व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंडाचा त्रास होत नव्हता. पण आता महापालिकेने वाढवलेल्या दंडामुळे अनधिकृत जाहिराती करणारे, फलक उभारणाऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. अनधिकृत फलकासाठी पूर्वी ५० हजार रुपये दंड होता, आता तो थेट दोन लाख रुपये केला आहे, तर अनधिकृत बोर्ड, बॅनर आणि फ्लेक्स लावणाऱ्यांना प्रतिदिन एक हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये दंड घेतला जाणार आहे.