Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationE sakal

Pune News : महापालिकेत समाविष्ट २३ गावांसाठी उपायुक्तांसह २८ अधिकारी नियुक्त

पुणे महापालिकेने जुलै २०२१ मध्ये हद्दीलगतची २३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पण या गावातील पाणी, कचरा, रस्ते, सांडपाणी, पावसाळी गटार, पथदिवे यांचा अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे ४ उपायुक्त, ८ सहाय्यक आयुक्त आणि १६ संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी संदर्भात परिपत्रक काढले आहे. विशेष म्हणजे उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे १२ गावांची जबाबदारी दिली आहे.

पुणे महापालिकेने जुलै २०२१ मध्ये हद्दीलगतची २३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पण या गावातील पाणी, कचरा, रस्ते, सांडपाणी, पावसाळी गटार, पथदिवे यांचा अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यासंदर्भात विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली आहेत. विधिमंडळ अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते.

त्यानंतर या गावांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठित करण्यात येणार होती. याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असला तरी त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. दरम्यान आयुक्तांनी या गावांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करताना गावाची हद्द व लोकसंख्या लक्षात घेत २३ गावांची जबाबदारी वाटप करण्यात आली आहे. वाघोली, बावधन बुद्रूक ही दोन्ही गावे मोठी असल्याने या गावांसाठी एक उपायुक्त, एक सहाय्यक आयुक्त, दोन संपर्क अधिकारी आहेत. तर उर्वरित गावांसाठी स्वतंत्र अधिकारी न देता उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना दोन पेक्षा जास्त गावांची जबाबदारी दिली आहे.

उपायुक्त आणि २३ गावांची जबाबदारी

  • किशोरी शिंदे - वाघोली

  • संतोष वारुळे - म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रूक

  • आशा राऊत - कोपरे, कोंढवे-धावडे, सणसनगर, नांदोशी, नऱ्हे, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी

  • प्रसाद काटकर - औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रूक, गुजर-निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी

२३ गावांसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या नावे इथे पहा - https://www.pmc.gov.in/sites/default/files/circular/%207295-10102023.pdf

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com