pune municipal corporation
sakal
पुणे : पुणे महापालिका भवनात गाड्या लावण्यासाठी जागा नसल्याने उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा सर्वप्रथम फटका हा सामान्य नागरिकांना बसला आहे. करदात्या पुणेकरांच्या वाहनांना महापालिकेत प्रवेश दिला नाही आणि महापालिकेच्या चारीही बाजूला नो पार्किंग असल्याने त्यांनी गाड्या लावायच्या कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेत पार्किंगचा प्रश्न गंभीर होणार आहे हे दोन-तीन वर्षापूर्वीच लक्षात असतानाही त्यावर उपाय न केल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती निर्माण झाली आहे.