

PMC Workers Salary Issue
sakal
कोथरूड : कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडे घनकचरा व्यवस्थापन खात्यात सार्वजनिक स्वच्छता, कचरा वाहतूक विभाग व अन्य सर्व खात्यांत कार्यरत ५९ कंत्राटी कामगारांचे नोव्हेबर महिन्याचे वेतन कंत्राटदाराने अद्यापपर्यंत न दिल्याने त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना तातडीने वेतन देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पुणे महापालिका कामगार युनियन (मान्यता प्राप्त) यांनी महापालिका आयुक्त, उपायुक्त आदींच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.