Pune News : सुंदर पुण्यासाठी ‘शहर परिवर्तन कक्ष’, आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिली बैठक संपन्न; दर महिन्याला आढावा घेतला जाणार

Pune municipal corporation urban transformation plan 2026 : पुणे शहराचा कायापालट करण्यासाठी महापालिकेने ‘शहर परिवर्तन कक्ष’ स्थापन केला आहे. विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून रस्ते, पादचारी मार्ग, स्वच्छता व देखभाल दुरुस्तीची कामे २०२६ अखेरीस पूर्ण केली जाणार आहेत.
Pune municipal corporation urban transformation plan 2026

Pune municipal corporation urban transformation plan 2026

Sakal

Updated on

पुणे : पादचारी मार्ग दुरुस्त करणे, रस्ते स्वच्छता, अन्य शासकीय विभागांशी समन्वय ठेवून कामे करणे यातून २०२६ या वर्षात शहराचा कायापालट केला जाणार आहे. त्यासाठी ‘शहर परिवर्तन कक्षा’ची स्थापन करण्यात आली असून, त्याची पहिली बैठक आज (ता. ५) महापालिकेत पार पडली आहे. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या निमित्ताने सर्व शासकीय विभागांनी एकत्रित काम करुण पुण्यामध्ये मोठा बदल घडवला आहे. त्याच पद्धतीने पुढच्या एका वर्षात कामे केली जाणार आहेत असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com