Pune Municipal Corporation Sakal
पुणे
Pune Municipal Corporation : गायब फाइल आणून देण्याचे आवाहन; उपायुक्तांच्या नियुक्तीची कागदपत्रेच गहाळ
Missing File : पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांची नियुक्ती संबंधित फाईलच गायब झाली असून, महापालिका प्रशासनाने ती कोणाकडे आहे का यासाठी इतर विभागांना चौकशीचे पत्र पाठवले आहे.
पुणे : पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्या नियुक्तीची फाइलच गायब झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता ही फाइल कोणाकडे आहे का, असेल तर ती सामान्य प्रशासन विभागाला द्यावी, असे आवाहन करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली आहे.