

Security Rules
esakal
Pune Latest News: महापालिकेच्या महापौर कार्यालयाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या धर्तीवर महापालिकेत येणाऱ्या अभ्यागतांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. पुढील दहा दिवसांत त्याचा मसुदा समितीपुढे सादर केला जाणार आहे.