

Pune Municipal Corporation Launches PET Scan Centre
Sakal
पुणे : कर्करोगाचे उपचार करताना मोठ्या खर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडून जाते. पण या आजाराचे निदान कमी खर्चात करण्यासाठी महापालिकेची पेट स्कॅनची सुविधा प्रथमच शहरात उपलब्ध होणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता.१५) होणार आहे. या केंद्राला दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे नाव देण्यात आले आहे.