
Pune News
sakal
पुणे : पुणेकरांच्या कररूपात जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांतून बांधलेली रुग्णालये स्वतः न चालवता ठेकेदारांना देण्याचा पायंडा पाडणाऱ्या महापालिकेने आणखी एक नवे रुग्णालय बांधण्याचा घाट घातला आहे. आरोग्य विभागाकडून तळजाई पठार येथे ३०० खाटांची क्षमता असलेले नवे रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे हे नवीन रुग्णालय स्वतः चालवणार की ठेकेदारांच्या फायद्यासाठी चालवायला देणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.