
पुणे : महापालिकेचे ठेकेदार खड्डे बुजविताना निकृष्ट दर्जाचे काम करतातच, पण आता भर पावसात थेट रस्ते डांबरीकरण करण्याचा प्रकार सदाशिव पेठेतील हत्ती गणपती चौकात समोर आला आहे. त्यामुळे महापालिका एकीकडे रस्ते दुरुस्तीचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात काम सुमार दर्जाचेच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.