

Forty medical teams, 42 ambulances and reserved hospital beds have been arranged to ensure emergency medical support for pilgrims.
Sakal
पुणे : संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपचारविषयक नियोजन केले आहे. कमला नेहरू रुग्णालयात १० अतिदक्षता (आयसीयू) खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांना १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेचे सर्व दवाखाने कार्यालयीन वेळेत तसेच पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी मोफत उपचार उपलब्ध करून देणार आहेत.