2020-21 या वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 536 कोटी रुपयांनी अंदाजपत्रकात तरतूद कमी झाली आहे. गेल्या वर्षी ५ हज़ार ८१२ कोटींचा अर्थसंंकल्प होता.
पुणे : पुणे शहराच्या विकासाची दिशा दर्शविणारा 6 हजार 229 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडला. मिळकतकर 12 टक्के तर पाणीपट्टीत १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
2020-21 या वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 536 कोटी रुपयांनी अंदाजपत्रकात तरतूद कमी झाली आहे. गेल्या वर्षी ५ हज़ार ८१२ कोटींचा अर्थसंंकल्प होता.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, नगरसचिव सुनील पारखी, दरम्यान, यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात दांडी मारली. हातावर मोजण्याएवढेच नगरसेवकांची उपस्थिती होती.