

Pune Municipal Corporation
sakal
Pune Latest News: गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या मिळकतकरात वाढ केली नाही, उत्पन्न वाढत नसल्याने महापालिका प्रशासनाने अखेर मिळकतकरामध्ये १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावर येत्या सोमवारी (ता. २) महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम हे निर्णय घेणार आहेत. मात्र, अंतिम निर्णय हा २० फेब्रुवारीपूर्वी मुख्यसभेत घ्यावा लागणार आहे. त्यावेळी सत्ताधारी भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.