Pune News : प्रशासनाने गुपचूप केली ५ टक्के करवाढ, आता भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

property tax increase Pune : पुणे महापालिकेत आयुक्तांनी १०% ऐवजी ५% मिळकतकर वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव १८ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत येणार आहे. भाजप कर वाढ मंजूर करेल की फेटाळेल, पुणेकरांचे लक्ष या निर्णयावर लागले आहे.
property tax increase Pune

property tax increase Pune

sakal

Updated on

पुणे : गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मिळकतकरात वाढ केली नाही असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, याच बैठकीत आयुक्तांनी १० टक्केऐवजी ५ टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती मिळकतकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही नव्हती असा सावळा गोंधळ प्रशासनात सुरु आहे. हा मिळकतकर वाढीचा प्रस्ताव आता फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर घेण्यात आला आहे. १८ फेब्रुवारी रोजी यावर निर्णय होणार आहे. यावेळी सत्ताधारी भाजप प्रशासनाने गुपचूप केलेली ५ टक्के कर वाढ फेटाळणार की पुणेकरांना करवाढीचे ‘गिफ्ट’ देणार याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com