Pune Municipal CorporationSakal
पुणे
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेच्या ७५० कर्मचाऱ्यांना उशिरा येण्याबद्दल कारणे दाखवा नोटीस
PMC Actions : पुणे महापालिकेतील ७५० कर्मचारी वेळेच्या बाहेर कार्यालयात पोहचल्यामुळे थेट गेटवरच त्यांना अडवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पुणे : पुणे महापालिकेचे कामकाज सकाळी पावणेदहा वाजता सुरू होते, पण अनेक अधिकारी-कर्मचारी हे उशिरा येतात त्यामुळे त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे. अशा अधिकाऱ्यांबाबत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी कडक भूमिका घेतली. शुक्रवारी (ता. २२) सकाळी पावणेदहानंतर महापालिकेचे सर्व प्रवेशद्वार बंद केले. उशिरा आलेल्या सुमारे ७५० कर्मचाऱ्यांची नावे लिहून घेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. यामध्ये सहा विभाग प्रमुखांचा समावेश आहे.