
पुणे : शहरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेला रोज किमान ५०० टन डांबरमिश्रित खडीची आवश्यकता पडते. त्यासाठी हॉटमिक्स प्लांटमध्ये ‘एलडीओ’ नावाचे वंगण वापरून डांबर गरम केले जाते. यामुळे येरवडा परिसरात प्रचंड प्रदूषण होत असून, स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता पथ विभागाने हे डांबर एलपीजी गॅसवर गरम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रदूषण रोखले जाणार आहेच, पण खर्चात किमान २० टक्क्यांची बचत होणार आहे.