
पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारी (ता. ४) प्रशासनाकडून ही प्रभागरचना राज्य सरकारकडे सादर केली जाणार आहे. त्यापूर्वी आज (ता. १) महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सावरकर भवन येथील निवडणूक शाखेच्या कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला.