
पुणे : महापालिकेच्या शहरी गरीब योजनेमुळे अटी-शर्तींमध्ये मिळकतकराची अट नव्हती, तरीही प्रशासनाने या योजनेचे लाभार्थी कमी करण्यासाठी परस्पर अर्ज नामंजूर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ५१३ जणांचे अर्ज थांबल्याने त्यांची वैद्यकीय मदत अडवली गेली आहे. यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी मिळकतकर विभागाचा अभिप्राय घेण्याच्या नावाखाली पुन्हा त्यास विलंब लावला जात आहे.