

Civic Chaos: Mismanagement Over Road Repairs Leaves Pune Residents at Risk Ahead of Monsoon
पुणे : पुणे महापालिकेने सेवा वाहिन्या टाकण्यासाठी मोबाईल कंपनी, वीज कंपन्या यासह अन्य संस्थांना परवानगी दिली आहे. शहरात ६८ हजार ६७४ मीटर लांबीचे रस्ते खोदले आहेत. त्याच प्रमाणे पोलिसांच्या सीसीटीव्हीसाठी खोदलेले रस्ते अजूनही पूर्णपणे दुरुस्ती झालेले नाहीत. असे असताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते बुजविण्याची जबाबदारी पथ विभागाकडे की क्षेत्रीय कार्यालयांकडे यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. या समस्येकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात पुणेकरांना खड्ड्यांचा अन् चिखलाचा सामना करावा लागणार आहे हे निश्चित.