
मुंबई : फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषद आणि पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय बुधवारी (ता. २५) घेण्यात आला. पुणे महापालिका हद्दीतील गावांच्या विविध प्रश्नांबाबत बुधवारी आमदार विजय शिवतारे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहात विशेष बैठक झाली. यावेळी गावांतील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.