

Pune Tilak Bridge river debris action
sakal
पुणे : नदीपात्रात टिळक पुलाच्या शेजारी मध्यरात्री २० ट्रक राडारोडा टाकणाऱ्या आकांक्षा डेव्हलपर्सचे बांधकाम बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, ती जागा महापालिकेने सील केली आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यास १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नदीपात्रात किंवा अन्य कुठेही राडारोडा टाकल्यास आम्ही कोणालाही सोडणार नाही. आता हे प्रकार सहन केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच ही कडक कारवाई केल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.