

Complaints Raised Over PMC Sweeping Tender Process
Sakal
पुणे : पुणे महापालिकेतर्फे शहरातील रस्ते, सार्वजनिक जागा झाडून काढण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, त्यात काळ्या यादीत टाकलेले ठेकेदार, आर्थिक क्षमता नसलेल्या कंपन्यांना पात्र ठरविले गेले असल्याने या निविदा प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान, या संदर्भात तक्रारी आल्याने महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पुणे शहरातील रस्ते, पडिक हद्दी, सार्वजनिक जागेची रोजची स्वच्छता करण्यासाठी १४ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्वतंत्र निविदा काढल्या जातात. गेल्यावर्षी निविदा समितीने या निविदांसाठी पूर्णपणे नियम व अटी टाकल्या होत्या.