
येरवडा येथील गोल्फ क्लब चौक येथे वाहतुकीत बदल
पुणे : महापालिकेकडून येरवडा येथील गोल्फ क्लब चौकाच्या परिसरातील उड्डाणपुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी खांबावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी गोल्फ क्लब चौकातुन जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. गोल्फ क्लब चौकातील वाहतुकीमध्ये बदल करण्याचे काम येरवडा वाहतुक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. त्यानुसार, वाहतुकीत बदल करुन पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
दुचाकी व हलक्या वाहनांवर काही प्रमाणात निर्बंध
येरवडा वाहतुक शाखेकडून उड्डाणपुलाच्या कामामुळे हलक्या वाहनांवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार आंबेडकर चौकातुन गोल्फ क्लब चौकमार्गे शास्त्रीनगर चौकाकडे जाणारी दुचाकी व हलकी वाहने गोल्फ क्लब चौकातुन डावीकडे वळून जीएसटी भवन येथून वळसा घालून गोल्फ क्लब चौकातुन डावीकडे वळून शास्त्रीनगर चौकाकडे जाईल. शास्त्रीनगर चौकाकडून गोल्फ क्लब चौकामार्गे आंबेडकर चौकाकडे जाणारी दुचाकी व हलकी वाहने गोल्फ क्लब चौकातुन डावीकडे वळून पुलाला वळसा घालून पुढे गोल्फ क्लब चौकातुन डावीकडे वळून आंबेडकर चौकाकडे जातील, असे
वाहतुक बंद
शास्त्रीनगर चौकाकडून गोल्फ क्लब चौकमार्गे आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या व आंबेडकर चौकाकडून शास्त्रीनगरकडे जाणाऱ्या जड वाहतुकीस बंदी
पर्यायी मार्ग
शास्त्रीनगर चौकाकडून आंबेडकर चौकाकडे जाणारी वाहतुक शास्त्रीनगर चौक सरळ गुंजन चौक,पर्णकुटी चौकातुन डावीकडे वळून महात्मा गांधी चौक तेथून आंबेडकर सेतुवरुन तारकेश्वर चौक , चंद्रमा चौक, पुढे आळंदी रस्त्याने इच्छित स्थळी जावे
आंबेडकर चौकातुन गोल्फ क्लब चौकमार्गे शास्त्रीनगर चौकाकडे जाणारी वाहतुक आंबेडकर चौक, सादलबाबा चौक, डावीकडे वळून गुंजन चौक, तेथून शास्त्रीनगर चौकमार्गे पुढे
Web Title: Pune Municipal Corporation Traffic Changes Golf Club Chowk In Yerawada Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..