Pune Municipal Corporation : प्रभागरचनेत ‘गावांचा’ विचार व्हावा; उंड्री, पिसोळी, होळकरवाडी, हांडेवाडीतील नागरिकांची मागणी
Ward Formation : महापालिकेत समाविष्ट झालेल्या उंड्रीसह गावांसाठी स्वतंत्र प्रभागांची मागणी होत असून, सध्याच्या लोकसंख्येवर आधारित रचना व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
उंड्री : महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभागरचनेत समाविष्ट गावांचा सकारात्मक विचार व्हावा, अशी नागरिकांना आशा आहे. मूलभूत सुविधांसाठी प्रभागरचनेत समाविष्ट गावांचे स्थान महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने आता तरी न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.