Vande Mataram Deepotsav Pune Guinness World Record News : पणत्यांच्या प्रकाशात उजळला ऐतिहासिक शनिवारवाडा! वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षानिमित्त पुणे महापालिकेच्या दीपोत्सवाची गिनीज बुकमध्ये नोंद

Global Record Set by Pune Municipal Corporation : अवघ्या अर्ध्या तासात ३८ हजार २३३ पणत्या प्रज्वलित करून साकारले 'वंदे मातरम्'; महापौर मंजूषा नागपुरे यांच्या संकल्पनेतील उपक्रमाने रचला इतिहास
Pune Municipal Corporation's Deepotsav registered in Guinness Book.

Pune Municipal Corporation's Deepotsav registered in Guinness Book.

Sakal

Updated on: 

पुणे : हातात पणत्या... ओठांवर देशभक्तीची गीते... पार्श्वभूमीवर लष्करी बँडचे वीररसपूर्ण सूर आणि ‘वंदे मातरम्’चा जयघोष... अशा भारावलेल्या वातावरणात शनिवारवाड्याचा परिसर शनिवारी उजळून निघाला. वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणे महापालिकेने आयोजित केलेल्या दीपोत्सवात झेन झी तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अवघ्या अर्ध्या तासात ३८ हजार २३३ पणत्या प्रज्वलित करून त्यातून ‘वंदे मातरम्’ साकारण्यात आले. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची घोषणा होताच शनिवारवाड्याचा परिसर जल्लोषाने दुमदुमून गेला.

Loading content, please wait...