Pune News: पुणेकरांनो सावधान! होळीसाठी झाडे कापलीत तर १ लाखांचा दंड अन् कायदेशीर कारवाई होणार; नेमका कुणी दिला इशारा?

Ban on tree cutting Pune: पुणे महानगरपालिकेने होळीच्या काळात झाडांच्या फांद्या तोडणे आणि बेकायदेशीरपणे झाडे तोडणे थांबवण्याचा इशारा दिला आहे. १ लाख रुपयांपर्यंत दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.
Ban on tree cutting Pune

Ban on tree cutting Pune

ESakal

Updated on

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने झाडांच्या फांद्या तोडणे आणि बेकायदेशीर वृक्षतोडीविरुद्ध कडक इशारा जारी केला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे, जाळणे किंवा नुकसान करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन कायदा २०२१ अंतर्गत, परवानगीशिवाय झाड तोडल्यास संबंधित झाडाच्या किमतीएवढा दंड आकारला जाऊ शकतो. जो कमाल १ लाख रुपयांपर्यंत असू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com