

PMC's New Waste Collection Method
Sakal
पुणे : पुणे महापालिकेने ढकल गाड्यातून कचरा गोळा करण्याऐवजी थेट मोठ्या गाड्या फिरवल्या जात आहेत. यास स्वच्छ संस्थेचा विरोध आहे. आता महापालिकेच्या गाड्यांना कचरा संकलनासाठी प्रचंड उशीर होत आहे, तसेच कचरावेचक महिलांना दुपारी अडीच-तीनपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते. शहरातील एक हजार ७६ संकलन केंद्रांवर ३२ टक्के ठिकाणी गाड्या उशिरा येत आहेत, असा आरोप होत आहे. मात्र, प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत महापालिकेच्या धोरणाला विरोध करण्यासाठी हा गैरसमज नागरिकांमध्ये निर्माण केला जात आहे, असे स्पष्ट केले आहे.