
उंड्री : तरवडेवस्ती-वानवडी रस्त्यावर कृष्णानगर लष्कर येथे पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर चेंबर बांधले. मात्र, त्याला झाकण नसून, आऊटलेट नसल्याने त्यामध्ये दूषित पाणी साचले आहे. दुर्गंधीयुक्त पाणी झिरपून जलवाहिनी फुटली असेल, त्या ठिकाणी मिसळत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावे लागत असल्याची तक्रार येथील सुवर्णा शिवरकर, स्मिता भुजबळ, नलिनी जाधव, सुनंदा वाडकर, सौदामिनी घुले, अस्मिता तरवडे या महिलांनी नागरिकांच्या वतीने केली.
पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मागिल तीन महिन्यांपासून कृष्णानगर येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही. उपनगर आणि लगतच्या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी वारंवार फुटणे आणि व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे.
लष्कर पाणीपुरवठा केंद्राकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. या कामाची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. पालिका प्रशासनाने जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलाव्यात आणि व्हॉल्व्ह, तसेच सार्वजनिक ठिकाणच्या नळाला चाव्या बसवून पाणी गळती थांबवावी, अशी मागणी सचिन आंबेकर, निखिल तरवडे, सुभाष जरांडे, मयुर डांगमाळी, गुलाब वाडकर, खंडेराव जगताप, सचिन सातव, संजय भुजबळ, संतोष जाधव यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिकेने उपनगरालगतची गावे समाविष्ट करून घेतल्यानंतर करवसुली सुरू केली आहे. मात्र, त्या बदल्यात किमान नागरी सुविधासुद्धा मिळत नाहीत. कचरा उचलला जात नाही, पिण्याचे पाणी मिळत नाही.
-शीतल जाधव, तरवडेवस्ती
उपनगर आणि लगतच्या गावातील पाझर तलाव परतीच्या पावसाने तुडुंब भरले आहेत. धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे, तरीसुद्धा आम्हाला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. समाविष्ट गावातील नागरिक कर भरतात, त्याबदल्यात किमान पिण्याचे पाणी तरी द्या.
-रेश्मा भुजबळ- कृष्णानगर
दरम्यान, लष्कर पाणीपुरवठा केंद्रप्रमुख सुभाष पावरा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.